म्युचल फंड आज का गरजेचं आहे ? भाग 2
नमस्कार, आपण मागच्या भागात बघितलं की म्युच्युअल फंड आज का गरजेचं आहे .आपल्या पारंपरिक इन्व्हेस्टमेंट बरोबरच म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्युचल फंड मध्ये अगदी कोणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ज्यांचं बँकेत अकाउंट आहे ती प्रत्येक व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये अगदी छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकते . आपण मागच्या भागात म्युच्युअल फंडचे दोन महत्त्वाचे प्रकार पाहिले. १) एस .आय .पी .( SIP ) SYSTEMATIC INVESTMENT PLAN. 2) एक रकमी LUMSUM . आज आपण एस .आय .पी .(SIP) म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत . नक्की एसआयपी आपण कशा प्रकारे करू शकतो ? किती दिवस करू शकतो? कधी काढू शकतो ? जास्ती वेळ ठेवल्यास किती फायदा होऊ शकतो ? आणि कमी वेळेमध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो? तुम्हाला देखील हे प्रश्न पडत असतील ना तर मग आजचा ब्लॉग हा तुमच्यासाठीच आहे . या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि 'Harshali's wealth creation wisd...