START SAVING EARLY AGE TO have a secure FUTURE
नमस्कार , आज आपण आपले रिटायरमेंट प्लॅनिंग करणार आहोत, रिटायरमेंट हा शब्द जरी ऐकला तरी लोक घाबरतात. तीस-पस्तीस वयाच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात की आता तर आमचं आयुष्य सुरू झालं आता कुठे रिटायरमेंट च्या गोष्टी करतात आणि ते लक्ष देत नाही. 40 /45 वयाच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला 50 वर्षापासुनच रिटायरमेंट चालू करायचे आहे कारण ते आपल्या कामाला इतके कंटाळलेले असतात. पण आपण नाही कमवलं तर आपलं घर कसं चालेल म्हणून ते स्वतःला रेटत असतात.पण तेव्हा वेळ खूप कमी असतो आपल्याकडे रिटायरमेंट साठी आणि सेविंग करण्यासाठी सुद्धा . आणि नंतर जसजसं वय वाढायला लागतं तेव्हा रिटायरमेंट चे प्लॅनिंग चे वेध लागतात की रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला पैसे कसे मिळतील, आपलं नेहमीच लाइफस्टाइल आपण जगू शकू की नाही? का पैशाअभावी आपल्याला वाईट परिस्थिती येईल? असे अनेक प्रश्न सतावू लागतात. साठीपर्यंत आपल्या बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात ,काहींना आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवलेले असतात पण जी लोक आधीपासूनच जागरूक असतात त्यांची हेल्थ आणि वेल्थ दोन्ही चांगल्या परिस्थ...