Posts

Showing posts from December, 2020

Mutual Fund सही है ! Mutual Fund म्हणजे नक्की काय?

Image
 नमस्कार , आपण आज कल टीव्हीवर म्युचल फंड सही है  ! ही ऍडव्हर्टाईस नेहमी बघत असतो .त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर येतो कधी धोनी असतो ,आणि छोटीशी माहिती ते आपल्याला त्याच्यामध्ये देतात तेव्हा आपल्यालाही वाटतं की आपण सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करावं. पण आपल्याला  म्युचल फंड, शेअर मार्केट ही नावं ऐकल्यावर हे सर्व आपल्यासाठी नाही आहे असं वाटतं   का ? म्युचल फंड म्हटलं की आपले पैसे बुडले तर ? हे सर्व श्रीमंतांचे पैसे वाल्यांचे शब्द आहेत ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. बँकेमधील एफडी, पी पी एफ, पोस्ट बचत, आदी पारंपरिक पर्यायाव्यतिरिक्त गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून म्युचल फंड  कडे सध्यां पाहिले जात आहे .या प्रकाराकडे सर्वसामान्यं नागरिकांचा ओघ वाढताना दिसत आहे, मात्र यातील अनेकांनी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केलेली नसते त्यामुळे या पर्यायात प्रवेश करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. पैशाला पैसा ओढतो ही म्हण तुम्हाला माहीतच असेल ही म्हण म्युचल फंड मध्ये अगदी तंतोतंत लागू पडते ....