महत्त्वाच्या 5 अशा सवयी ज्या आपल्याला घेऊन जातील आपल्या आर्थिक स्वातंत्र्याकडे.
नमस्कार , प्रत्येक माणूस हा आपल्या सवयींच्या अधीन असतो. कितीही प्रयत्न केले तरी त्या सवयीं च्या बाहेर पडणे त्याला खूप कठीण असते चांगल्या सवयी असतील तर खूप पुढे जाऊ शकतो पण जर का वाईट सवयी असतील तर आपण कालांतराने मागे पडत जातो पण जर का खरंच मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच आपण आपल्या चुकीच्या सवयीतून तून बाहेर पडू शकतो पण यासाठी आपल्याला योग्य वातावरणाची योग्य माणसांची सोबत लागते. आज आपण येथे काही आर्थिक सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला असं वाटतं का की...... माझा खर्च हा माझ्या कमाई पेक्षा जास्त आहे..... कितीही प्रयत्न केला तरी मी खर्चाला आटोक्यात आणू शकत नाही ...... सेविंग करण्यासाठी माझ्याकडे पैसे उरत नाहीत..... आधी पैसे येऊन दे मग मी सेविंग करतो...... जर का या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 15 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्य...