म्युचल फंड आज का गरजेचं आहे ? भाग 2
आपण मागच्या भागात म्युच्युअल फंडचे दोन महत्त्वाचे प्रकार पाहिले.
१) एस .आय .पी .( SIP ) SYSTEMATIC INVESTMENT PLAN.
2) एक रकमी LUMSUM .
आज आपण एस .आय .पी .(SIP) म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत .
नक्की एसआयपी आपण कशा प्रकारे करू शकतो ?
किती दिवस करू शकतो?
कधी काढू शकतो ?
जास्ती वेळ ठेवल्यास किती फायदा होऊ शकतो ?
आणि कमी वेळेमध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो?
तुम्हाला देखील हे प्रश्न पडत असतील ना तर मग आजचा ब्लॉग हा तुमच्यासाठीच आहे .
या सगळ्या गोष्टी आपण आजच्या
ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
नमस्कार,
मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि 'Harshali's wealth creation wisdom' या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 20 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
SIP नक्की कशी काम करते त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी खाली देत आहे.
समीर आणि स्वप्निल हे दोघेही लहानपणीचे मित्र, दोघांचे शिक्षणही एकत्र झालेलं, नोकरीला सुद्धा एकत्रच लागले, दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातलेच होते. पण समीरच्या कुटुंबामध्ये एक सवय होती की कितीही पैसे मिळाले तरी त्यातले थोडेसे पेेैसे बाजूला ठेवून बाकीच्या पैशांनी आपलं घर चालवायचे. त्या काळात इन्व्हेस्टमेंटची साधनं कमी होती त्यामुळे अडी अडचणीला हे पैसे कामी यायचे, आणि हेच संस्कार समीर वर सुद्धा झाले होते.
पण स्वप्निल कडे मात्र चित्र वेगळं होतं समीरच्या कुटुंबापेक्षा स्वप्निलच्या कुटुंबाचं उत्पन्न हे जास्ती होतं पण पैसे आले की यांच्या गरजाच कधी भागत नसायच्या, त्यामुळे यांची उधारी सतत बाकी असायची आणि महिन्याच्या अखेरीस काहीच शिल्लक नसायची आणि अचानक काही प्रॉब्लेम उद्भवला तर बाहेरून उधारी घेऊन हे सगळं भागवलं जायचं त्यामुळे पैशांची नेहमीच कमतरता भासत असायची.
पण समीर बरोबर राहून स्वप्निल ने देखील त्यांचे चांगले संस्कार घेतले होते अडीअडचणीला पैसे हे लागतातच त्यासाठी त्याची तरतूद आधीच करून ठेवणं गरजेचं आहे हे त्याला माहिती होतंं आणि त्याप्रमाणे या दोघांनीही त्यांना जेव्हा नोकरी लागली तेव्हा या सगळ्यांची सुरुवात केली होती.
स्वप्निल पैसे बाजूला ठेवायचा पण काही कालांतराने लगेचच त्याचे पैसे खर्च व्हायचे काही ना काहीतरी कारण यायचं आणि तो पैसे ते खर्च करून टाकायचा त्यामुळे त्याच्या हातात काहीच शिल्लक राहायचं नाही पुन्हा तो त्याच परिस्थितीवर यायचा.
पण समीरने मात्र त्याच्या वयाच्या 30 व्या वर्षापासून आपलं निश्चित ध्येय ठरवून पगारातून एक ठराविक रक्कम बाजूला ठेवायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत त्याने ते पैसे बाजूला ठेवले.
कालांतराने समीरची इन्व्हेस्टमेंट बघून स्वप्निल ने देखील 40 व्या वर्षापासून समीर पेक्षा जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे ठरवले वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत स्वप्निल चे पैसे हे समीरच्या पैशांपेक्षा बरेच जास्ती होते कारण त्याने एक मोठी अमाऊंट दर महिन्याला बाजूला ठेवायची ठरवली होती.
पण समीरने सुरुवात मात्र स्वप्नील च्या खूप आधीपासून केली होती ,आणि पैसे कमी इन्व्हेस्ट करून सुद्धा साठाव्या वर्षी समीरला किती पैसे मिळाले ते पाहूया आणि जास्त पैसे इन्व्हेस्ट करून स्वप्निल ला किती पैसे मिळाले ते देखील पाहूया.
(Systematic investment plan) SIP .
तर मित्रांनो ही गोष्ट होती समीर आणि स्वप्निलची आपल्या प्रत्येकामध्ये देखील एक समीर किंवा स्वप्निल लपला आहे. त्यातील कोणाला नक्की आपण बाहेर काढायचे हे आपणच ठरवायचे आहे.
या म्युच्युअल फंड च्या SIP मध्ये आपण पाच वर्ष, दहा वर्ष, पंधरा वर्ष आपली जशी ध्येयं असतील त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो .जेवढा जास्त कालावधी तेवढा परतावा जास्त हे तर आपण पाहिलंच असेल.
कोणाला सोनं खरेदी करायचं असेल , कुणाला वर्ल्ड टूर करायची असेल ,कुणाला एखादं वाहन घ्यायचं असेल यासाठी सुद्धा आपण ही एसआयपी करू शकतो आणि आपलं निश्चितच ध्येयं नक्कीच गाठू शकतो. वरील या सगळ्या गोष्टींसाठी लोन घेऊन जास्ती कर्ज भरण्यापेक्षा थोडा आधी विचार करून योग्य एसआयपी करून कोणतही लोन डोक्यावर न घेता आपण या सर्व गोष्टी मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला हवी ती फक्त एक चांगली सवय एसआयपीची.
आयुष्यातील महत्त्वाच्या स्टेप्स ओळखायला शिका. आणि जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येईल तेवढ्या लवकर आर्थिक स्वातंत्र्याच्या जास्त जवळ जाऊ शकाल.
त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.👇
तर मग विचार कसला करताय आजच ठरवा की आपण दर महिन्याला म्युचल फंड मध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायला हवे आहेत .
त्यासाठी नक्कीच मी तुम्हाला मदत करू शकते याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मला 9892420809 या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता, तसेच खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही म्युचल फंड साठी अकाउंट ओपन करून तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता.
https://fundzbazar.com/Link/5pQUVlNsl54
अशाच आणखीन महत्त्वाच्या टिप्स घेऊन मी माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये येत आहे .
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.




VERY USEFUL & INFORMATIVE BLOG, THANK YOU SO MUCH FOR PROVIDING SUCH A VALUABLE GUIDANCE THROUGH THIS BLOG.
ReplyDeleteThank you sir🙏
DeleteMethodical explanation,it will help youngesters a lot ,keep posting.
ReplyDeleteThank u Manjusha Mam 🙏
Delete