आयुष्यातील महत्वाची बचत .... आरोग्य-विमा (MEDICLAIM)
तुम्हाला माहित आहे का की आज आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ?
यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे ?
ही गोष्ट जर का आपल्याकडे नसेल तर आपल्याला किती संकटाना सामोरे जावे लागेल ?
जर ह्या सगळ्यांची उत्तर जाणून घ्यायची असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .
मित्रांनो आज आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य. आजकाल आपण पहाताे आपल्या आजूबाजूला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप जण पुढे येताना दिसत आहे.
पण आपल्या सर्वांच्या कामाचं स्वरूप पाहाता, आजूबाजूचं वातावरण पाहता ,प्रत्येकाकडे इतका ताण असतो की काहीही केलं तरी तो कमी होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात ,संशोधनातुन सिद्ध झाले आहे कि 99% आजार हे मानसिक कारणांमुळे उद्भवतात आणि असेच जर मोठे आजार उद्भवले तर आपण काय करू शकतो.
नमस्कार,
मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 17 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग आपण जाणून घेऊया काय करू शकतो ते......
आपण पैशांची बचत का करतो ?
आपण आपल्या आयुष्यात काही महत्त्वाच्या ध्येयासाठी पैशांची बचत करतो की पुढे जाऊन त्याची आपल्याला गरज भासू शकेल ,वेळेवर ते पैसे उपयोगी पडू शकतील, या सर्व कारणांसाठी आपण त्या पैशांची बचत करत असतो.
पण या सर्व गोष्टी करताना आपण एका गोष्टीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि ही गोष्ट कीती महत्त्वाची आहे हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि हाच उशीर आपल्याकडून होऊ नये त्यासाठी ही माहिती तुमच्या नक्कीच उपयोगी ठरेल.
आपण कशाबद्दल बोलत आहोत याची तुम्हाला कल्पना आलीच असेल ...हो मित्रांनो ! आरोग्य विमा ..आपल्या आयुष्यात इतका महत्त्वाचा आहे ती त्याची जेव्हा गरज भासते तेव्हाच महत्व कळतं या विम्याचे .
आजच्या काळात करोना या संसर्गाच्या काळात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच अनुभव घेत आहोत कित्येक लोक आपल्यातून निघून गेले किती जण या महामारिशी झुंजत आहेत,कित्येकांची नोकरी गेली, कित्येक जण पैशा अभावी चुकीचे निर्णय घेत असल्याचे दिसत आहे.
आणि अशातच आपल्या कडे जर का अशी परिस्थिती निर्माण झाली ,आणि कोणाला हॉस्पिटल मध्ये अँडमिट होण्याची वेळ आली तर आपलं आर्थिक बजेट नक्कीच ढासळू शकतं.
या साठी प्रत्येकाकडे sufficient आरोग्य विमा असणे आवश्यक आहे .
तुम्हालाही असेच वाटते का की आपल्याला कधीच काही होणार नाही?
आपल्याला काय होतंय, या विचाराने बरेच जण आरोग्यविमा घेत नाही .पण वेळ हि कधी सांगून येत नाही .आजार गरीब-श्रीमंत बघून येत नाही,आपण हेल्दी राहण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत पण जर का एक्सीडेंट झालं तर मग काय ? अशी बरीच कारणे असू शकतात जेनेटिक असू शकतात, काही ठराविक कालावधीनंतर उदभवु शकतात.
बरेच जण आरोग्य विमा हा काढायचा म्हणून काढतात. एक किंवा दोन लाखाचा पण त्यांना जर का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली आणि एखादा मोठा आजार असेल तर आपल्याला याचा काहीच उपयोग होत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आम्ही इतकी वर्षे पैसे भरतोय आम्हाला काहीच झालं नाही तर आमचे पैसे फुकट जातात.
इथे माझ्या एका क्लाइंट च उदाहरण देऊ इच्छिते काही दिवसांपूर्वी एका सीनियर सिटीजन ना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता . गेले सहा वर्षे पॉलिसीचे पैसे ते भरत होते, आतापर्यंत कधीच काही प्रॉब्लेम आला नव्हता म्हणून त्यांनी पॉलिसी वाढवली सुद्धा नाही. आणि मागच्या महिन्यात अचानक त्यांना ब्रेन स्ट्रोक मुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कराव लागलं आणि त्याचा खर्च तब्बल त्यांना सात ते आठ लाख रुपये हॉस्पिटल ने सांगितला आणि पॉलिसी होती फक्त दोन लाखाची ती पण सीनियर सिटीजन .
एकतर ते रिटायरड, मुलाची ही नोकरी नाही त्यांचे सर्व सेविंग मधले पैसे, पेन्शन साठी ठेवलेले पैसे त्यांना बाहेर काढावे लागले आणि हॉस्पिटलचे बिल भरावे लागले, आणि आता पॉलिसी वाढवून देखील मिळणार नव्हती कारण का एकदा प्रॉब्लेम आला तर पॉलिसी वाढवून मिळत नाही. अजून पुढे जाऊन खर्च हा हाेताच .या सर्व विचारानीच मन सुन्न झालं.
अजून मी एका क्लाइंट च उदाहरण इथे देऊ इच्छिते त्यांनी त्यांच्या ग्रुप इन्शुरन्स मध्ये एक छोटा मेडिक्लेम ठेवला होता .त्यांना वारंवार सांगून देखील मला काहीच होणार नाही याच उद्देशाने त्यांनी त्यांचा मेडिक्लेम विमा वाढवला नाही. आणि वयाच्या 55 व्या वर्षी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांच्या ग्रुप इन्शुरन्स मध्ये पॉलिसी फक्त दीड लाखाची होती आता या आजारासाठी भरपूर खर्च झाला स्वतःच्या खिशातून पैसे टाकावे लागले आणि आता मेडिक्लेम वाढवून देखील मिळत नव्हता आणि काही काळानंतर त्यांना किडनी फेल्युअर चे देखील निदान झाले आता तर खूपच प्रॉब्लेम झाला होता खूप प्रयत्न करून देखील मेडिक्लेम कुठूनच मिळत नव्हता आणि जी काही आपली जमापुंजी आहे ती यात खर्च करावी लागत होती .या सर्व गोष्टी आपल्या बरोबर होऊ नये ,त्यासाठी आता लागत नाहीये, मला काहीच होणार नाही असा विचार करून मेडिक्लेम बद्दल जागरूक न रहाणे ही आपल्या आयुष्यात मोठी चूक ठरू शकते.
म्हणून काही हेल्थ प्रॉब्लेम नसतानाच मिनिमम पाच लाखाची तरी पॉलिसी काढुन ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.आणि गरज लागल्यास टॉप अप पॉलिसी घेता येते. कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी आपल्याला गरज आहे म्हणून दिली जात नाही ,तर तुमची हेल्थ चांगली असते तेव्हाच दिली जाते ,आणि तेव्हा का आपण काढून ठेवली असेल तर उद्या आपली हेल्थ खराब झाली तरी ती कंटिन्यू राहू शकते. ह्यासाठीच आपल्याला आपली पॉलिसी कंटिन्युटी मध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
बर्याच जणांना आपला मेडिक्लेम चा हप्ता भरण्यासाठी खूप मोठा वाटतो, पण याकडे खर्च न बघता गरज म्हणून बघणे अत्यंत आवश्यक आहे .ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या गोल साठी पैसे बाजूला ठेवतो त्याचप्रमाणे या मेडिकल इमर्जन्सी साठी पैसे बाजूला ठेवणे गरजेचे आहे .जसा आपला महिन्याभराचा खर्च असतो तसाच हा एक छोटा खर्च आहे असे समजून दर महिन्याला यासाठी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले तर आपल्याला हप्त्या चे पैसे भरण्यासाठी भार पडणार नाही.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
अधिक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक खाली देत आहे.
👇
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
Group join करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom
अगदीच खरं आहे आपली हेल्थ किती महत्वाची आहे. पण जर mediclaim नसेल तर खूप मोठ आर्थिक नुकसान होऊ शकत. खूप मस्त ब्लॉग आहे.
ReplyDeleteThank you tai🌹
DeleteVery very important blog for everyone Thanks ma'am
ReplyDelete🙏🌹
Deleteखूप छान ब्लॉग 👍👍🌹
ReplyDeletethank you ma'am
DeleteYour blogs always provide good values, information, knowledge sharing,real examples...Great...
ReplyDeletethank you sir🌹
Delete