5 SMALL TIPS TO CREATE A BIG CORPUS
तुम्हाला असं वाटतं का की तुमचं income खूप कमी आहे?
मी जे काही कमवतो त्यातून मी बचत करू शकत नाही?
पण मला पैसे मात्र खूप हवे आहेत ?
आता खर्च करू पुढचं पुढे बघू ?
पुढे solution निघेल ?
असे प्रश्न जर का तुम्हाला पडत असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .
तुम्हाला या ब्लॉग मधून नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील आणि यातून कसा मार्ग काढू शकतो आणि आपल्या छोट्या इन्कम मधून कसा मोठा corpus निर्माण करू शकतो, याच्या 5 छोट्या पण अफलातून अशा टिप्स इथे आपण पाहणार आहोत.
नमस्कार,
मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि 'Harshali's wealth creation wisdom' या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 18 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
1) 50/50 चा नियम :
आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की कितीही इन्कम असलं किंवा आपल्यापेक्षाही ज्यांचं जास्त इन्कम असतं त्यांचही नेहमी असच कथन असतं की आम्हाला पैसे पुरत नाहीत.
हे असं का होतं कारण आपल्या इ्न्कम नुसार आपलं राहणीमान असतं ,आपलं स्टॅंडर्ड मेण्टेन करण्यासाठी गरज नसतानाही आपण खर्च करत असतो, इतरांना दाखवण्यासाठी बऱ्याच वेळेला खर्च केला जातो, तरी इथे आता आपल्याला थोडं अलर्ट व्हायचं आहे गरज नसलेला खर्च टाळून वरील 50/50 चा नियम पाळायला सुरुवात करायची आहे.
पण सगळ्यांसाठी हेच कारण असेल असही नाही, काही जणांना खरच आपण कमवलेले पैसे आपल्या साध्या गरजासाठी देखील पुरत नाही त्यांच्यासाठी नंबर 2 टीप खूप महत्त्वाची आहे.
आज आपण जसं राहत आहोत तसंच राहणीमान किंवा त्यापेक्षाही चांगलं राहणीमान आपल्याला भविष्यातही ठेवायचं असेल तर वरील 50/50 चा नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
यामध्ये आपलं जे काही इन्कम आहे कमी असो वा जास्त असो त्यातील 50% फक्त खर्च झाले पाहिजेत बाकीचे पन्नास टक्के हे कंपल्सरी सेविंग मध्येच गेले पाहिजेत आणि या सेविंग मधल्या 50 टक्क्यांमध्ये प्रत्येकी दहा दहा टक्के आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ,आपल्या रिटायरमेंट लाईफ साठी, आपल्या छोट्या छोट्या गोल साठी, आपल्या मेडिकल इमर्जन्सी साठी, बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
2) आपल्या ज्ञानामध्ये सतत वाढ करण्याचा प्रयत्न करणे :
आपण सर्वजण शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो नंतर तत्सम डिग्री अशा प्रकारचं शिक्षण घेऊन इन्कम करण्यासाठी तयार होताे. आणि या ज्ञानावर आपण आयुष्यभर अवलंबून राहतो. पण आता गरजेनुसार सतत बदलणाऱ्या टेक्नॉलॉजी नुसार आपल्याला तयार होणे गरजेचे आहे आपल्या ज्ञानात नवीन भर टाकल्याशिवाय आपण पुढे जाऊ नाही शकत आपलं इन्कम आपण वाढवू नाही शकत .आपल्याला पुढे जाण्यासाठी जे गरजेचे आवश्यक असलेले ज्ञान आहे ते घेणे गरजेचे आहे, आणि यासाठी आपली मानसिक तयारी ठेवणे हे आपल्या भविष्यासाठी व आपल्या चांगल्या इन्कम साठी नेहमीच योग्य असेल.
तसेच आपल्या सवयींमध्ये काही बदल करणे, माहितीपूर्वक पुस्तक वाचणे ,आपल्या क्षेत्रातल्या यशस्वी लोकांची वाटचाल जाणून घेणे, त्यांना आलेल्या प्रॉब्लेम्स मधून ते काय काय शिकले त्यातून आपण काय घेऊ शकतो या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाण्यासाठी व चांगले इनकम मिळवण्यासाठी नक्कीच मदत करतात.
3) चक्रवाढी चा प्रभाव (compounding effect) :
बरेच जण आपण कमावलेले सर्व पैसे हे खर्च करण्यासाठीच वापरतात, मग त्यांचं इन्कम कमी असो वा जास्ती असो .कमी पडल्यास आणखीन लोन घेऊन त्याच्यावर दुपटीने व्याज भरून आणखीन संकटात सापडतात. पण कालांतराने त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतात आणि सतत ते टेन्शनमध्येच राहतात असे प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला थोडा दूरचा विचार करणे गरजेचे आहे.
आपल्या इन्कम मधील काही पैसे हे आपल्यावर व आपले स्किल डेव्हलप करण्यासाठी ,नवीन नवीन टेक्निक शिकून घेण्यासाठी वापरले पाहिजे ज्यामुळे या सगळ्याचा वापर करून याचा compounding effect आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच येऊ शकेल .
त्याच प्रमाणे दर महिन्याला एक ठराविक रक्कम stocks मध्ये किंवा म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून त्याचा जबरदस्त असा compounding effect आपण घेऊ शकतो ,पण त्यासाठी आपल्याकडे पेशन्स असणे खूप गरजेचे आहे .एखाद्या stock मध्ये आपण दर महिन्याला हजार रुपये असे 30 वर्ष जरी गुंतवले तरी ती रक्कम करोडो रुपयांमध्ये बदलू शकते .पण आपण विचार करतो की हे तीस वर्ष कोणी पाहिलेत एवढे वर्षे थांबून काय फायदा. पण हे 1000 तुम्ही आत्ता सुद्धा नाही गुंतवले तर 30 वर्षाने तुमची आणखीन बिकट परिस्थिती येऊ शकते....त्यासाठी थोडा दूरचा विचार करून compounding effect ने तुम्ही समृद्धीकडे जाऊ शकता. पण यासाठी सातत्य consistency असणे खूप गरजेचे आहे.
दगडाच्या आणि पाण्याच युद्धात नेहमी पाणी जिकतं ताकदीच्या जोरावर नाही तर सातत्याच्या जोरावर. हे सातत्य आपल्याला आयुष्यामध्ये परफेक्ट बनवतो.
त्यासाठी नक्कीच मी तुम्हाला मदत करू शकते याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता, तसेच खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही म्युचल फंड साठी अकाउंट ओपन करून तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता.
https://fundzbazar.com/Link/5pQUVlNsl54
4) vision :
आपण आपल्या आयुष्यामध्ये जशी परिस्थिती येईल त्या प्रमाणे ॲक्शन घेत असतो पण ठरवून प्लॅनिंग करून ॲक्शन घेण्याकडे आपला कल कमी असतो. थोडी दूरदृष्टी ठेवून त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर बऱ्याच गोष्टी आयुष्यात सोप्या होणार असतात. आयुष्यात येणाऱ्या मोठ्या खर्चाचं प्लॅनिंग उ दा. लग्न, मुलांचे शिक्षण ,आपले रिटायरमेंट लाईफ आपली स्वप्न , इमर्जन्सी फंड त्याचप्रमाणे मेडिकल साठी केलेलं प्लॅनिंग, हेल्थ साठी केलेलं प्लॅनिंग या सगळ्याचं VISION आपण प्रॉपर करू शकलो तर आयुष्यात मोठ्या मोठ्या संकटांचा सामना सहज करू शकतो.
आपल्याला नेहमी सर्व गोष्टी आज आत्ता आणि ताबडतोब अशाच हव्या असतात थांबण्यासाठी जरासुद्धा वेळ नसतो पण निसर्गाच्या नियमानुसार कोणत्याही गोष्टीसाठी एक विशिष्ट कालावधी लागतो जर का त्याविरुद्ध आपल्याकडे एखादी गोष्ट आली तर तिचा टिकाव जास्ती काळ नसतो.
एखाद्या लहान मुलाचंच बघाना त्याचा जन्म झाल्या नंतर हळूहळू तो मोठा होतो ,असं होतं का की तो जन्माला आल्या आल्या चालायला ,बोलायला ,शिकायला ,लागेल तर नाही त्यासाठी कालावधी हा लागतोच आणि तो आपल्याला देणे गरजेचं असतं कारण त्याला दुसरा पर्यायच नसतो. इथे निसर्गाचाच नियम लागू पडतो तसाच प्रत्येक ठिकाणी पैशांच्या बाबतीत देखील हा नियम लागू पडतो. आपल्याला एखादं आर्थिक संकट आलं तर आपण आपल्या नशिबाला किंवा देवाला दोष देऊन आपण मोकळे होतो आणि तेच खडतर आयुष्य जगत राहतो. पण आपल्या काय काय चुका झाल्यात याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतो .म्हणूनच मित्र-मैत्रिणींनो आपल्याला दूरदृष्टी ठेवून काम करणे अत्यंत गरजेचे आहे.
5) कृती (ACTION) :
आपल्याला वरचे सगळे नियम मान्य देखील असतात, आपण त्याचा बऱ्याच वेळेला विचार देखील करत असतो पण या सगळ्या गोष्टी आपल्या मनातच राहतात या सगळ्यावर ॲक्शन घेणे आपल्याला खूप कठीण होतं .एक तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर वातावरण नसतं आणि आपण लहानपणापासून ज्या वातावरणात राहिलोय त्याप्रमाणेच आपलं मन ऑटो मोड मध्ये चालत असते आणि हे सगळ करण्यासाठी कोणाला भेटायचं कोणते निर्णय योग्य आहेत हेच मुळी आपल्याला कळत नाही आणि बऱ्याच वेळेला भीतीपोटी आपण कितीतरी निर्णय घेतच नाही.
पण आता आपले सर्व ध्येय पूर्ण करण्यासाठी वरती दिलेल्या टिप्स चा नक्की वापर करायचा आहे आणि आपलं आयुष्य हे आनंदी आणि समृद्ध बनवायचं आहे .काही गोष्टी यासाठी जाणीवपूर्वक करणे त्यावर ॲक्शन घेणे गरजेचे आहे.
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.
Very informative blog👍👍
ReplyDeleteThank you kirti tai🙏
ReplyDeleteखूपच सुंदर ब्लॉग आहे
ReplyDeleteखूप महत्त्व पूर्ण माहिती
अतिशय उपयुक्त
Thank you 🙏
DeleteVery useful blog👍👍
ReplyDeleteThank u Vaivi🙏
ReplyDelete