5 Powerful TipsTO LIVE LIFE KING SIZE
नमस्कार मित्रांनो ,
तुम्हाला माहित आहे का, की जर का आपल्या आयुष्यांत आर्थिक स्वातंत्र्य नसेल , तर आयुष्याच्या बर्याच टप्यांवर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तुमच्या महत्वाच्या गरजा पूर्ण हाेऊ शकत नाहीत, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न, आपली स्वप्ने, सहली, आपले Retirement जीवन .या सारख्या अनेक आर्थिक ध्येया मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात..
आज मी तुम्हाला अशा 5 powerful tips देणार आहे की ह्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणल्या तर नक्कीच तुमचं आयुष्यं ही तुम्ही राजा प्रमाणे जगू शकाल. याची मी खात्री देते. ....
नमस्कार ,मी हर्षाली एडनकर wealth creation expert आणि Harshali's Wealth creation wisdom या platform ची संस्थापिका . या क्षेत्रात मी गेली 15 वर्षे कार्यरत असून येत्या 3 वर्षामध्यें 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth creat करण्यासाठी मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग आपल्या आयुष्यात काेणत्या 5 गोष्टी आणायला हव्या आहेत, यासाठी हा Blog शेवट पर्यंत वाचा, आणि आपल्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य आणा...
1. Human Life value :HLV
या साठी आपली स्वतःची काय किंमत आहे हे जाणून घेण्याची खुप गरज आहे . उदा. तुमचं मासिक वेतन हे 50,000 असेल तर 50,000*200 = 1cr . कमीत कमी एवढी आापली Risk cover( HLV)असली पाहीजे .
आणि ही Risk Cover आपण महीन्याला अगदी लहान रक्कम जमा करून मिळवून घेऊ शकताे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ही सविस्तर माहिती घेऊ शकता.
देव न करो पण आपल्याबरोबर काही वाईट घटना घडली तर आपल्या परिवाराला, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही आपल्या मुलांसाठी, घरासाठी पाहिलेली स्वप्नं नक्की पुर्ण होतील.
2. आरोग्य विमा :
आपल्याबरोबर असं बरेच वेळा हाेऊ शकतं ,की आपण एखादी रक्कम ठराविक गरजांसाठी बाजुला ठेवुन देताे,आणि अचानक आरोग्याच्या काही मोठ्या तक्रारी मुळे सर्व रक्कम तिथे फिरवली जाते, मोठा खर्च असेल तर आयुष्याची सर्व कमाई तिथे जाऊ शकते , आणि आयुष्यात खुप अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ह्यासाठी आपल्या आयुष्यात योग्य आरोग्य विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. याेग्य आरोग्य विमा कसा व किती असावा व घ्यावा याच्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला याची अधिक माहिती मिळू शकेल.
3. निश्चिंत येणारे खर्चासाठी योग्य नियोजन :
आपल्या आयुष्यात बरेच असे खर्च अपेक्षित असतात की त्यांना आपण टाळु शकत नाही. उदा. मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न हे महत्त्वाचे असे खर्च आहेत,पण नियोजन अभावी खुप मोठ्या संकटाचा सामना करावा लागताे. बरेचदा आपल्याला त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि ते हप्ते भरण्यातच बराच आपला उमेदीचा काळ निघून जातो. आणि खूप जास्त प्रमाणात व्याजदर भरून परतफेड केली जाते.
पण त्याचे योग्य नियोजन आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकतो. येणाऱ्या खर्चासाठी आधीच जागरूक होउन त्याची तयारी सुरू केली तर चक्रवाढव्याजा प्रमाणे दर महिन्याला खूप लहान रक्कम जमा करून त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आपल्याला हवी असलेली रक्कम आपण सहज मिळवू शकतो. ती कशी हे आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ह्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता.
4.छाेट्या छाेट्या ध्येयां साठी नियोजन :
आपल्या सर्वांचीच काही ना काही स्वप्ने असतात, कोणाला बाईक , कोणाला कार, तर कोणाला युरोप ट्रीप ,तर कोणाला एखादा दागिना. प्रत्येकाची त्याच्या गरजेनुसार स्वप्न असतात.
त्यानुसार 3/4 वर्षाचे उद्दीष्ट घेऊन किती रक्कम लागेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार दर महिन्याला थोडी रक्कम योग्य ठिकाणी Invest करावी. त्यानुसार आपल्या आनंदासाठी आपले ध्येय साध्य करण्यासाठी नक्कीच आपण सक्षम हाेऊ.
5. Retirement जीवन.
प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपल्या Retirement जीवनामध्ये आपण आर्थिक दृष्ट्या आपल्या आप्तांवर अवलंबून न राहता, स्वतः सक्षम असणे आवश्यक आहे.
पण बर्याच वेळा हे होताना दिसत नाही. आपलं सर्व आयुष्यं, आपली सर्व पुंजी आपण आपल्या मुलांसाठी, घरासाठी वापरतो. आणि जेव्हां आपल्याला त्याची गरज असते तेव्हा आपल्याकडे खूप कमी रक्कम शिल्लक असते. आणि ती खर्च करू का नको याचा ताण सतत येत असताे.
हे आपल्या बरोबर हाेऊ नये म्हणून आपले Retirement planning अगदी लहान रक्कम जमा करून करू शकतो. जेवढी लवकर सुरूवात तेवढी रक्कम मोठी.
ह्या 5 गोष्टी आपण आपल्या आयुष्यांत आणल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य राजासारखच असेल.
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
Group join करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom




Khupach chhan Information
ReplyDeleteMadam link dya
ReplyDeleteखूप छान blog हर्षाली 👏👏👏👏👏
ReplyDeleteInformative and useful
ReplyDeleteखुप छान ताई
ReplyDeleteVery useful information 👍 Vary
ReplyDeleteThank u very much
ReplyDeleteछानच !👌
ReplyDeleteलिंक मात्र मी शोथल्या परं
तु त्या कुठेही सापडल्या नाहीत !
Khup sundar blog aahe. Keep it up👍
ReplyDeleteKhup khup chan
ReplyDeleteKhup chan Harshali .
ReplyDeleteVery nice , informative blog.
ReplyDeleteVery nice खूप छान लिहिला आहे
ReplyDeletePowerful
ReplyDeleteVery Nice Information
ReplyDeleteKeep it up Harshali 👍