Mediclaim Accept होण्याच्या 5 जबरदस्त TIPS.

Health insurance policy  घेताना कोणत्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. 

नमस्कार,

तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे का?

 तुमचा क्लेम  कधी रिजेक्ट झाला आहे का? 

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी चा फायदा होत नाही असं तुम्हाला वाटतं का? 

जर का ह्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे

हेल्थ इन्शुरन्स घेणारे लोक खूप प्रामाणिकपणे प्रत्येक वर्षी पैसे भरतात कारण की अचानक कोणते आजार आले तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं तर आपल्याला सगळा खर्च मिळेल .पण  कधी कधी असं होतं की आपला मेडिक्लेम Reject होतो आणि आपल्याला मानसिक व आर्थिक दोन्ही तणावांचा सामना करावा लागू शकतो .

मेडिक्लेम रिजेक्ट होण्यामागची काही बेसिक कारणं आहेत जर का ती आपल्याला माहिती असतील तर आपला मेडिक्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता खूप नगण्य असते आणि ती कारणे कोणती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जाणून घ्या मेडिक्लेम चे मार्मिक सत्य. 

नमस्कार,

मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या  platform  ची संस्थापिका या क्षेत्रात मी गेली 15 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची  wealth  creat  करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे. 

चला तर मग पाहूया आपण कोणत्या कारणांमुळे आपला mediclaim  रिजेक्ट होऊ शकतो .

1)  हेल्थ इन्शुरन्स घेताना घ्यावयाची काळजी :


जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो तेव्हा आपली पूर्ण मेडिकल माहिती देणे गरजेचे आहे. त्यात आपली उंची ,वजन, बीपी ,शुगर ,फॅमिली मेडिकल हिस्ट्री ,कोणते ऑपरेशन झाले असेल तर त्याची माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.बऱ्याच वेळेला पॉलिसी घेताना ही माहिती योग्य दिली जात नाही आणि एखादा क्लेम आल्यावर जर का पेशंट ने hospital  मध्ये वेगळया  प्रकारची माहिती दिली तर आपला क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता असते म्हणून जी माहिती  पॉलिसी काढताना दिली आहे तीच माहिती हॉस्पिटलमध्ये देणे गरजेचे आहे.

2) हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता ना नक्कीं काय     करायचे: 


जर का आपला हेल्थ इन्शुरन्स असेल आणि आपल्याला कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली तर प्रथम ज्या कंपनीची हेल्थ पॉलिसी आपल्याकडे आहे तिथे 24 तासात आपल्यात क्लेम चे इंटीमेशन देणे आवश्यक आहे काही कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे येऊन पेशंटला चेक करूनही जातात की खरच पेशंट ऍडमिट आहे का नाही .

बरेच जण हॉस्पिटल मधून घरी आल्यावर हेल्थ  इन्शुरन्सं  कंपनीला ऍडमिट झाल्याबद्दल  सांगतात  व क्लेम बद्दल विचारतात त्यावेळी क्लेम रिजेक्ट होऊ शकतो ,किंवा त्याची प्रॉपर कारणे त्यांना कंपनीला द्यावी लागतात मग हि खूप लांब प्रोसिजर होऊ शकते आणि आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर 24 तासात कंपनीला इंटीमेशन  देणे गरजेचे आहे.

3) क्लेम सबमीट करताना कोणते डॉक्यूमेंट असणे गरजेचे असते :

मेडिक्लेम मध्ये  दोन प्रकार असतात:

1) Cashless  

2) Reimbursement  

जर का आपण कंपनीच्या पॅनल लिस्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात बाकीचा खर्च कॅशलेस मध्ये होतो नंतर ते पैसे परत आपल्याला दिले जातात, फक्त आपल्याला पॉलिसी तिथे दाखवावी लागते .

आणि दुसऱ्या प्रकारात आपल्याला सर्व डॉक्युमेंट Discharge  झाल्यावर 15 दिवसाच्या आत कंपनीकडे सुपूर्द करावे लागतात व त्यानंतर IRDA च्या rules  प्रमाणे आपला claim पंधरा ते तीस दिवसात सेटल होऊन ते पैसे आपल्या अकाउंट मध्ये येतात. 

डॉक्युमेंट मध्ये काही पेपर खूप महत्त्वाचे असतात जर का ते नसतील तरी आपल्या क्लेम Reject होऊ शकतो ते डॉक्युमेंट कोणते आहेत ते आपण पाहू .

a)  हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यापूर्वी ट्रीटमेंट घेतलेल्या       डॉक्टर चा रिपोर्ट.

b) Pathology Reports.

c)  Hospital Bill .

d)  Discharge card.

e)  Indoorcase paper.  

f) सर्व medical bills with patients name.

 हे सर्व डॉक्युमेंट असणे खूप गरजेचे आहे claim सबमिट करताना.

4) Operations Claim रिजेक्ट का होतात :


प्रत्येक कंपनीचा rule  असतो Health policy घेतल्यानंतर कोणतेही ऑपरेशन हे दोन वर्षांनी आपण claim करु शकतो व तेही आधीच्या आजारांमध्ये नसेल तर म्हणजे (pre existing disease ) 4 वर्षानंतर pre existing disease ही cover  केले जातात पण त्याआधी पॉलिसी घेताना मेन्शन ते केले असेल तरच. पॉलिसी घेताना ते आपण सांगितले नसतील आणि चार वर्षांनी क्लेम आल्यावर कंपनी ला  समजलं की हा प्री एक्झीटींग आजार आहे तरीपण आपला claim रिजेक्ट होईल Rather ती पॉलिसीच कधीकधी रिजेक्ट होऊ शकते. म्हणून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपली पूर्ण मेडिकल हिस्ट्री सांगणे अत्यंत गरजेचे आहे.

5) Claim मिळताे पण तो कमी मिळतो :


 बरेच वेळेला आपल्याला  claim  मिळतो पण तो कमी दिला जातो त्याचं प्रमुख कारण असतं ते म्हणजे, उदाहरणार्थ एखाद्याने 5 लाखाचा इन्शुरन्स घेतला असेल व त्याचा  3 लाखाचा खर्च आला असेल तरी त्याला खर्च 300000 मिळेलच असं नाही कारण हॉस्पिटलचा खर्च हा परसेंटेज वाईज डिवाइड केलेला असतो जर का त्यांना 5000 Room Rent त्याच्यां पॉलिसीमध्ये मिळत असेल आणि ते आठ हजार रुपयांच्या Room Rent  मध्यें ट्रीटमेंट घेत असतील तर वरचा खर्च पेशंटला स्वतःला करावा लागतो कंपनी पे करत नाही कारण पाच हजार रुपयांचा खर्चा प्रमाणे इतर सर्व खर्च  जास्तीत जास्तं दिला जाताे रूम रेंट वाढलं तर इतर सर्व खर्च वाढतात व त्याचा खर्च पेशंटला करावा लागतो म्हणून या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या पॉलिसीमध्ये किती रूम रेंट मिळू शकतो तेवढ्याच ward  ची निवड करावी  मग आपल्याला सर्व खर्च मिळू शकतो. 

या सर्व गोष्टींची काळजी आपण घेतली तर आपला claim  कधीच रिजेक्ट होणार नाही आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी चा पुरेपूर फायदा आपल्याला होऊ शकतो .

अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group joint  करा. 

आपल्याला हा Blog आवडला असेल  तर नक्कींच  like, share ,Comment करा. 

हा  BLOG शेवटपर्यंत  वाचल्याबद्दल  धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.

Group joint  करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

5 Powerful TipsTO LIVE LIFE KING SIZE

म्युच्युअल फंड आज का गरजेचे आहे?

तुमचं PASSIVE INCOME तयार करा या 5 जबरदस्त टिप्स मधून.