Mutual Fund सही है ! Mutual Fund म्हणजे नक्की काय?
नमस्कार ,
आपण आज कल टीव्हीवर म्युचल फंड सही है ! ही ऍडव्हर्टाईस नेहमी बघत असतो .त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर येतो कधी धोनी असतो ,आणि छोटीशी माहिती ते आपल्याला त्याच्यामध्ये देतात तेव्हा आपल्यालाही वाटतं की आपण सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करावं.
पण आपल्याला म्युचल फंड, शेअर मार्केट ही नावं ऐकल्यावर हे सर्व आपल्यासाठी नाही आहे असं वाटतं का ?
म्युचल फंड म्हटलं की आपले पैसे बुडले तर ?
हे सर्व श्रीमंतांचे पैसे वाल्यांचे शब्द आहेत ?
या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
बँकेमधील एफडी, पी पी एफ, पोस्ट बचत, आदी पारंपरिक पर्यायाव्यतिरिक्त गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून म्युचल फंड कडे सध्यां पाहिले जात आहे .या प्रकाराकडे सर्वसामान्यं नागरिकांचा ओघ वाढताना दिसत आहे, मात्र यातील अनेकांनी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केलेली नसते त्यामुळे या पर्यायात प्रवेश करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
पैशाला पैसा ओढतो ही म्हण तुम्हाला माहीतच असेल ही म्हण म्युचल फंड मध्ये अगदी तंतोतंत लागू पडते .
आज मी तुम्हाला म्युचल फंड म्हणजे नक्की काय ?
हे कशाप्रकारे काम करते ,आपण त्यात कशाप्रकारे इन्वेस्टमेंट करून आपले पैसे वाढवू शकतो याची सविस्तर माहिती देणार आहे.
त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा
मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका या क्षेत्रात मी गेली 15 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग पाहूया
1. म्युचल फंड म्हणजे नक्की काय :
जर का तुम्हाला सुरक्षित इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मार्केट बद्दल माहिती नाही आणि वेळही नाही आहे पण आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे चांगले वाढले पाहिजेत, तर म्युचल फंड हा एक खूप चांगला ऑप्शन असू शकतो.
बरेच लोक म्युचल फंड व शेअर मार्केट हे एकच समजतात हे दोघेही मार्केटचे भाग आहेत पण या दोघांमध्ये बराच फरक आहे .
म्युचल फंड मध्ये बऱ्याच लोकांचे पैसे गोळा करून एक फंड तयार केला जातो तिथे एक फंड मॉनेजर नियुक्त केला जातो, जो मार्केट मधला एक्सपर्ट असतो आणि तो आपल्या सगळ्यांचा फंड कोण कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा की जिथून आपल्याला Profit हाेऊ शकेल हे पाहतो तो हे पैसे एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट न करता वेगवेगळ्या ठिकाणी Invest करतो त्यामध्ये काही ठिकाणी Loss जरी झाला तरी काही ठिकाणी Profit नक्कीच होत असतो, त्यामुळे आपले इन्व्हेस्टमेंट हे Average मध्ये Profit मध्येच असते.
म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट A. M. C (Asset management company.) द्वारा केली जाते. सोप्या शब्दांमध्ये याला Fund house हि बोलले जाते. म्युचल फंड A. M. C हे भारत सरकारची संस्था सेबीच्या (SEBI) अंतर्गत रजिस्टर असते.
भारतात शेअर मार्केटचे पैसे नियंत्रित करणे व इन्वेस्टर चे पैसे सुरक्षित पद्धतीने ठेवण्याचे काम सेबी (SEBI) द्वारा केले जाते.
2. म्युचल फंड काम कसं करतो :
A. M. C द्वारा म्युचल फंड कंपनी चालवल्या जातात. उदाहरणार्थ: 100 लोकांनी पाच हजार रुपये म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले तर हे पाच लाख रुपये फंड मँनेजर त्याच्या टीम बरोबर रिसर्च करून ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो ज्याप्रमाणे काही पैसे शेअर मार्केट काही Govt. Bond काही Corporate Bond काही F. D. मध्ये काही Gold मध्ये काही Security Bond मध्ये वेगवेगळ्या stock मध्ये इन्व्हेस्ट केले जातात ज्यायोगे आपल्याला जास्तीत जास्त PROFIT कमवला जाऊ शकेल यात काही ठिकाणी जर का आपल्याला Loss झाला तरी काही ठिकाणी PROFIT होतो. आणि Average मध्ये आपण प्रॉफिट मध्येच असतो .
म्युचल फंड मध्ये जर का Long Term इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला पंधरा ते सोळा टक्क्याने PROFIT RETURN मिळु शकतो .म्युचल फंड कंपनी PROFIT चा खुप छोटा भाग स्वतःकडे ठेवतो व बाकीचा प्रॉफिट आपल्या इन्वेस्टर मध्ये वाटताे.
3. म्युचल फंड चे प्रकार :
आपण आज Mutual fund चे प्रकार जाणून घेणार आहोत की त्याचे कोणते मुख्य प्रकार असतात. म्युचल फंड मध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत ,पण आपण आज Asset class base म्युच्युअल फंडाचे प्रकार जाणून घेणार आहोत .
1. इक्वीटी म्युचल फंड .
2. डेट म्युचल फंड .
3. हायब्रीड म्युचल फंड .
इक्विटी M.F. - मध्ये आपले पैसे हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात यामध्ये Profit चांगले मिळण्याची शक्यता असते पण मार्केट अप-डाऊन होत असल्यामुळे इथे Risk पण जास्त असते इथे आपलं रिटन शेअर मार्केटच्या परफॉर्मन्स वर डिपेंड असतं शोर्ट इन्वेस्टमेंट साठी हा प्लॅन योग्य ठरणार नाही पण long term इन्वेस्टमेंट असेल तर इथे चांगला प्रॉफिट आपण मिळवू शकतो त्यासाठी पाच ते दहा वर्ष थांबणे गरजेचे आहे.
डेट म्युचल फंड - जर का आपण म्युचल फंड मध्ये जास्त Risk घेऊ शकत नसाल तर डेट फंड हा योग्य पर्याय असतो. ही Low risk इन्व्हेस्टमेंट असते. डेट म्युचल फंड मध्ये पैसे safe ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात. e.g.Govt. Bond, Security Bond, Corporate Bond आपण या मध्ये कितीही दिवसासाठी पैसे इन्व्हेस्ट करू शकतो आणि कधीही काढू शकतो तीन ते पाच वर्षासाठी हा डेट फंड चा ऑप्शन चांगला ठरू शकतो.
हायब्रीड म्युचल फंड - हा फंड इक्विटी फंड आणि डेट फंड यांचा मिलाप असतो .इथे आपले पैसे दोन्ही ठिकाणी इक्वली इन्व्हेस्ट केले जातात या म्युचल फंड मधले पैसे इक्विटी शेअर मार्केटमध्ये व गव्हर्मेंट बॉण्ड या दोन्ही मध्ये हे इन्व्हेस्ट केले जातात हा फंड डेट फंड पेक्षा जास्त रिस्की व इक्विटी फंड पेक्षा कमी रिस्की असतो हा पण शॉर्ट term साठी ही चांगला ठरू शकतो म्हणजे इक्विटी शेअर मार्केटचा प्रॉफिट ही मिळू शकतो आणि डेट फंड मुळे आपले पैसे Safe ही राहतात.
4. पूर्व इतिहास तपासा :
म्युचल फंड योजनेच्या पूर्वीच्या कामगिरीवर भविष्यातील कामगिरी वा परतावा अवलंबून नसतो हे ध्यानात घ्या. मात्र या या योजनेची या फंडाची पाच ते दहा वर्षांपूर्वीची कामगिरी कशी होती याचा आढावा जरूर घ्यावा आर्थिक सल्लागार असे सांगतात. तरी दहा वर्षाच्या कालावधीत या योजनांनी किमान परतावा दिला आहे का हे तपासावे या विविध टप्प्यात संबंधित फंडांनी चांगली कामगिरी केली असेल तर तिच्या फंड हाऊस बाबत निश्चित राहण्यात काहीच हरकत नाही.
5. म्युचल फंड चे फायदे :
आपण म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे हे एक्सपर्ट द्वारा रिसर्च करून इन्व्हेस्ट केले जातात वेगवेगळे Stock मध्ये. त्यासाठी आपल्याला डोकं लढवण्याची गरज लागत नाही या एक्सपर्ट लोकांना मार्केटचा पूर्ण नॉलेज असतं हे याच कामासाठी नियुक्त केलेले असतात त्यांची पूर्ण नजर ही मार्केट वर असते ज्यामुळे आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात.
जर का आपल्याला आपले पैसे वाढवायचे असतील आणि सध्यांच्या महागाईच्या हिशोबाने सध्याचा जाे इन्फ्लेशन रेट आहे त्याचा विचार करता म्युचल फंड हा ऑप्शन खूप योग्य ठरू शकतो .
आपल्या महत्त्वाच्या Long Term Goal साठी कंपाउंड बोनस, Compounding bonus प्रमाणे आपण खूप चांगला Profit मिळवू शकतो.
अशीच आणखीन उपयुक्त आणि इंटरेस्टिंग म्युचल फंड संबंधित माहिती मी पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊन येणार आहे.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
Group join करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom










Sahi he👌👌
ReplyDeleteThank u
DeleteGreat Harshal khoopach chhan mahiti dilit.
ReplyDeleteखूप छान हर्षाली . तू आर्थिक साक्षरता आणत आहेस . खूप जणांना या सर्व गोष्टींची माहिती नसते . थँक्स
ReplyDeleteहर्षाली खूप छान लेख
ReplyDeleteखूप छान माहिती दिली
धन्यवाद...!
Thank u tai
Deleteखूप छान माहिती दिली आहेस हर्षाली
ReplyDeleteबरेच गैरसमज दूर झाले
Thanku Harshali
Great going Harshali. Nice information. Just keep it up.
ReplyDeleteवा
ReplyDeleteग्रेट
खूपच छान माहिती दिलीत.
Thank you