START SAVING EARLY AGE TO have a secure FUTURE
नमस्कार ,
आज आपण आपले रिटायरमेंट प्लॅनिंग करणार आहोत, रिटायरमेंट हा शब्द जरी ऐकला तरी लोक घाबरतात. तीस-पस्तीस वयाच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात की आता तर आमचं आयुष्य सुरू झालं आता कुठे रिटायरमेंट च्या गोष्टी करतात आणि ते लक्ष देत नाही.
40 /45 वयाच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला 50 वर्षापासुनच रिटायरमेंट चालू करायचे आहे कारण ते आपल्या कामाला इतके कंटाळलेले असतात.
पण आपण नाही कमवलं तर आपलं घर कसं चालेल म्हणून ते स्वतःला रेटत असतात.पण तेव्हा वेळ खूप कमी असतो आपल्याकडे रिटायरमेंट साठी आणि सेविंग करण्यासाठी सुद्धा . आणि नंतर जसजसं वय वाढायला लागतं तेव्हा रिटायरमेंट चे प्लॅनिंग चे वेध लागतात की रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला पैसे कसे मिळतील, आपलं नेहमीच लाइफस्टाइल आपण जगू शकू की नाही? का पैशाअभावी आपल्याला वाईट परिस्थिती येईल? असे अनेक प्रश्न सतावू लागतात.
साठीपर्यंत आपल्या बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात ,काहींना आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवलेले असतात पण जी लोक आधीपासूनच जागरूक असतात त्यांची हेल्थ आणि वेल्थ दोन्ही चांगल्या परिस्थिती असतात .
आपल्या पुढच्या येणाऱ्या परिस्थितीचा आधी थोडा विचार केला तर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण समर्थपणे करू शकतो .
आणि आपलं हे इन्कम आपण आपल्या आधीच्या इन्कम प्रमाणेच साठीनंतर कसे ठेवू शकतो हे आज आपण येथे पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला आपलं रिटायरमेंट लाईफ हे आनंदी उत्साही आणि टेन्शन विरहीत जगता येईल.
त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा
मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका या क्षेत्रात मी गेली 15 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग,
त्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल.
पहिल्यांदा आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील ,नाही शोधावे लागतील आणि त्याची उत्तरं स्वतःलाच द्यावी लागतील आणि त्यानुसार प्लॅनिंग कराव लागेल.
एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जेवढ्या लवकर आपण हे प्लॅनिंग सुरू करू तेवढी जास्त वेल्थ आपण येथे जमा करू शकणार आहोत.
1) आपण सध्या ज्या वयात आहोत म्हणजे आपला आज, आज आपल्याला प्रत्येक महिन्याला किती खर्च येतोय? याच्यामध्ये आपल्या पूर्ण कुटुंबाचा खर्च आपल्या मेडिकल चा खर्च आपल्या मुलांचा खर्च हा सगळा मिळून आपल्याला महिन्याला किती खर्च येतो हे काढायचे आहे.
2) त्यानंतर साधारण वीस वर्षांनी हा खर्च किती होऊ शकेल? याचा विचार करायचा आणि ती अमाऊंट एका कागदावर लिहून ठेवायची.
आज आपल्याला 30,000/- जर का खर्च येत असेल तर वीस वर्षानंतर नक्कीच तो 50 ते 60 हजारांवर जाणार आहे मुलांचा खर्च कमी होईल पण आपल्या मेडिकल चा खर्च वाढणार आहे.
याचा कधी आपण विचार केला आहे का? नाही ना, पण आता तो नक्की करा.
3) तुम्ही आता किती पैसे दर महिन्याला तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग साठी बाजूला ठेवू शकता याचा विचार करा?
साठ वर्षानंतर आपलं Active income हे कमी होणार आहे आणि आपली हेल्थ ही पूर्वीसारखी राहणार नाही धावपळ करण्यासाठी आणि तेव्हा आपलं Passive income हे एवढं असलं पाहिजे की आपलं Active income बंद आहे हे आपल्याला जाणवलं देखील नाही पाहिजे.
आपण आता एक चार्ट बघूया त्यात आपल्या रिटायरमेंट साठी कधी सुरुवात केली तर आपल्याला किती पैसे भरावे लागतील आणि ते किती मिळतील.
मग आता तुम्ही ठरवायचं आहे की आपण कधी आणि किती रुपयाने आपल्या रिटायरमेंट ची सुरुवात करायची आहे आणि आपलं रिटायरमेंट लाईफ हे आनंदी उत्साही आणि विना टेन्शन ने घालवायचा आहे.
अशीच आणखीन उपयुक्त आणि इंटरेस्टिंग माहिती मी पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊन येणार आहे.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
Group join करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom



हर्षाली ताई खूपच सुंदर ब्लॉग
ReplyDeleteThank u uchita
DeleteKhoopch chhan blog Harshali.👍👍
ReplyDeleteखूपच छान. अशीच भरपूर माहिती पुढेही देत ही विनंती
ReplyDelete