महत्त्वाच्या 5 अशा सवयी ज्या आपल्याला घेऊन जातील आपल्या आर्थिक स्वातंत्र्याकडे.

 नमस्कार ,

प्रत्येक माणूस हा आपल्या सवयींच्या अधीन असतो. कितीही प्रयत्न केले तरी त्या सवयीं च्या बाहेर पडणे त्याला खूप कठीण असते चांगल्या सवयी असतील तर खूप पुढे जाऊ शकतो पण जर का  वाईट सवयी असतील तर आपण कालांतराने मागे पडत जातो पण जर का खरंच मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच आपण आपल्या चुकीच्या सवयीतून तून बाहेर पडू शकतो पण यासाठी आपल्याला योग्य वातावरणाची योग्य माणसांची सोबत लागते.

आज आपण येथे काही आर्थिक सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.


तुम्हाला असं वाटतं का की......

माझा खर्च हा माझ्या कमाई पेक्षा जास्त आहे.....

कितीही प्रयत्न केला तरी मी खर्चाला आटोक्यात आणू शकत नाही ......

सेविंग करण्यासाठी माझ्याकडे पैसे उरत नाहीत.....

आधी पैसे येऊन  दे मग मी सेविंग करतो......

जर का या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. 

नमस्कार, 

मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या  platform  ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 15 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची  wealth  create  करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.  

जगविख्यात पुस्तक सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माईंड या पुस्तकात लेखकाने अतिशय मार्मिक पद्धतीने आपल्या आर्थिक सवयी बद्दल मांडणी केली आहे आणि त्याच पुस्तकाच्या अनुषंगाने आपण आज इथे 

अशा पाच महत्त्वाच्या सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपण सुद्धा आर्थिक दृष्टीने सक्षम होऊ शकू...

चला तर मग या आर्थिक सवयी कोणत्या आहेत ते पाहू.....

आपल्या घराची जशी ब्लूप्रिंट असते तशीच प्रत्येकाच्या डोक्यात एक आर्थिक ब्लूप्रिंट असते आणि प्रत्येकाजवळ त्याच्या जन्मापासून ही ब्लूप्रिंट असते आणि ती  कशी बनते तर आपल्याच आजूबाजूच्या लोकांमुळे ,आपले आईवडील आपले शेजारी, आपले शिक्षक आपले मित्र मत्रिणी आपले नातेवाईक. कोणती लोकं आपल्या लहानपणापासून आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्या विचारानुसार आपण घडत जातो आणि त्याच प्रकारे आपली मनी ब्ल्यू प्रिंट पण बनत जाते. आणि ती जर का दूषित असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याकडे पैसा राहत नाही, आणि ती दूषित होते आपल्या ला लागलेल्या  सवयी मुळे.

त्यासाठी आपल्याला आपल्या चुकीच्या सवयी बदलाव्या लागतील. 

त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे अशी पहिली सवय आहे

1) अनावश्यक खर्च टाळा:


जिथे खरंच खर्च करण्याची गरज नाही फक्त आपण आपल्या मानसिक समाधानासाठी ती गोष्ट घेत आहोत तिथे अलर्ट  व्हा काही  वेळ थांबून विचार करा. 

पहिल्यावेळी लोकं फक्त सणासुदीला शॉपिंग करायचे पण आता तसे दिवस राहिले नाही लोकांच्या खिशात क्रेडिट कार्ड नेहमीच असतं त्यामुळे मार्केटमध्ये गेल्यावर एखादा ड्रेस किंवा एखादी गोष्ट आवडली तर ती लगेच घेण्याचा कल असतो, जेव्हा आपल्याला असं वाटेल तेव्हा आपल्या घरातले कपाट आठवा आणि मगच कपड्यांची खरेदी करा.

2) Personal loan आणि  Credit card  चा वापर करणे शक्यतो टाळा :     


बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहेत म्हणून गरज नसताना सुद्धा आपण त्याचा वापर करतो, एखादी गोष्ट आवडली पण खिशात पैसे नसतील पण क्रेडीट कार्ड आहे तर ती वस्तू घेतली जाते आपल्याला काही दिवस  काहीही इंटरेस्ट न भरता पैसे वापरता येतात, पण कालांतराने जेवढे पैसे आपण खर्च केले आहेत तेवढ्या पैशांवर व्याज चालू होतं जर का आपण लक्ष देऊन ते  व्याज आणि मुद्दल वेळीच भरले तर काही प्रॉब्लेम नाही पण जर का आपल्या मनाला शिस्त नसेल तर कधीच ही मुद्दल वेळीच भरले जात नाही आणि आपल्याला व्याजदर जास्त लागून आपल्याला ती वस्तू खूप महाग पडते आणि जे कर्ज डोक्यावर येतं ते वेगळेच. आणि जर का आपण गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डचा वापर केला तर महिनाभराच्या आत ती  मुद्दल परत करा, म्हणजे कोणतही व्याज न भरता आपला क्रेडिट कार्ड चा उपयोग करता येईल. ही अतिशय महत्त्वाची अशी सवय मनाला लावून घ्या.

त्याचप्रमाणे पर्सनल लोन चं देखील असच आहे पर्सनल लोन हे जर का आपलं बँक स्टेटमेंट चांगलं असेल तर कधीही मिळतं बँक आपल्याला सतत त्याबाबत विचारणा करतच असतात कारण त्यावर खूप टक्के व्याज असतं, पण काही लोक ते सहजी मिळतंय आणि मला आता खूप गरज आहे म्हणून ते घेतात आणि भरताना खूप व्याजदर देऊन परतफेड करतात आणि मग नंतर त्यांना आपली चूक कळून येते. त्यासाठी आधीच थोडा विचार करून आपल्याला किती गरज आहे याचा विचार करा आणि मगच हे पाऊल उचला.

3) आपल्या कमाईचा 50% खर्च व 50% सेव्हिंग असा Ratio असला पाहिजे : 


महिन्याला आपलं जेवढं इन्कम असेल ...त्या पैशांची विभागणी करायला सुरुवात करा जवळजवळ पन्नास टक्के हे आपल्या सेविंग मध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे त्यामध्ये आपले छोटे मोठे गोल्स ,आपला इन्शुरन्स ,आपल्या मुलांचे शिक्षण, आपल्ं रिटायरमेंट  लाईफ यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यामुळे आपल्याला पुढे लोन घेण्याची व भरमसाठ व्याज देण्याची गरज पडणार नाही व आपला खर्च आटोक्यात राहील.

50 टक्क्यांमध्ये आपला महिन्याचा खर्च हा भागवला गेला पाहिजे आपले इन्कम कितीही असो कमी असेल किंवा जास्ती असेल .जर का ह्या Ratio  प्रमाणे आपण त्याची विभागणी केली तर आपल्याला भविष्यामध्ये मध्ये कधीच पर्सनल लोन घेण्याची गरज लागणार नाही.

4) passive income  वाढवण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. :


आपला नोकरी करण्याचा कालावधी हा सीमित असतो, नोकरी किंवा बिझनेस च्या सुरवातीच्या  काळापासूनच जर का आपण  योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या पन्नाशी मध्येच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे  PASSIVE INCOME   जनरेट करता येऊ शकेल. त्यासाठी रिअल इस्टेट, म्युचल फंड, शेअर्स ,असे विविध पर्याय आहेत आणि कोणतीही INVESTMENTS  ही LONG TERM  केली तर त्याचा  फायदा हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो.

आणि मग एकदा का आपला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं तर मग आपल्याला आवडीचं आणि निवडीचं स्वातंत्र देखील येतं. वॉरेन बफेट यांनी त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात केली होती आणि आज ते जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात आणि तरीही त्यांना असं वाटतं की आपण  खूप उशिरा सुरुवात केली. 

त्यासाठी आपल्याला गुंतवणुकीवर नवीन नवीन पुस्तक वाचणे गरजेचे आहे वेगवेगळे व्हिडिओज बघणे गरजेचे आहे.

5) फक्त पैसे जमा करू नका तर त्याचा योग्य वापर पण करा व आनंदही मिळवा:


काही लोक आपल्या भविष्याचा अति विचार करून आपला वर्तमान काळ हरवून बसतात. वर्तमान काळ हा पुन्हा कधीच येणार नसतो आणि जर का हाच आनंदात नाही घालवला तर भविष्यकाळ हा देखील दु:खात जाईल कारण आपल्या मनाला सतत पुढचा विचार करण्याची सवय लागते ,त्यासाठी आपल्याला वर्तमान काळात देखील आनंद घेणे गरजेचे आहे, वर सांगितल्याप्रमाणे आपल्या इन्कम चा 50 टक्के भाग आपल्या सेविंग साठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि या पन्नास टक्के मधला 10% टक्के भाग हा आपल्या आनंदासाठी बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे . सिक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईन्ड मध्ये लेखक म्हणतात की जर का हा आनंद आपण नाही उपभोगला तर एक वेळ अशी येईल की हा आपल्याला सोडून जाईल. आणि आपण अगदी काटकसरीने जमवलेले सगळे पैसे तो बरोबर घेऊन जाईल. त्यासाठी हा 10% खर्च हा आपल्यावर आपल्या आनंदावर करणे अत्यंत गरजेचे आहे.

तर मित्रांनो आपणही जर या आर्थिक सवयी आपल्याला लावून घेतल्या तर आपल्यालाही आवडीचं आणि निवडीचं आर्थिक स्वातंत्र्य नक्कीच मिळेल.

एक  POWERFUL आर्थिक  टीप  जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक खाली  देत आहे.   

https://youtu.be/0Ls5G0dbNt4

अशीच आणखीन उपयुक्त आणि इंटरेस्टिंग  माहिती मी पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊन येणार आहे.

आपल्याला हा Blog आवडला असेल  तर नक्कींच  like, share ,Comment करा. 

अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join  करा. 

हा  BLOG शेवटपर्यंत  वाचल्याबद्दल  धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.

Group join  करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

5 Powerful TipsTO LIVE LIFE KING SIZE

म्युच्युअल फंड आज का गरजेचे आहे?

तुमचं PASSIVE INCOME तयार करा या 5 जबरदस्त टिप्स मधून.