How To Beat INFLATION RATE (महागाई दर) Effectively.... In Our life.

 नमस्कार,

तुम्हाला असं वाटतंय का की दिवसेंदिवस महागाई चा दर हा वाढत चालला आहे ?

या महागाईचा कशाप्रकारे सामना करता येईल ?

काय केलं तर या महागाई मध्ये सुद्धा आपण आपले पैसे वाचवू शकु ?

असे सगळे प्रश्न तुम्हाला पडतात का !

जर का याचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .

 आज आपण INFLATION RATE  ला म्हणजेच महागाईच्या दराला कशाप्रकारे MANAG करू शकताे याबद्दल आज जाणून घेणार आहोत. 



नमस्कार, 

मी हर्षाली एडनकर wealth creation expert. Harshali's wealth creation wisdom या  platform  ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 17 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची  wealth  creat  करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.  

चला तर मग इन्फ्लेशन रेट कसा  वाढतोय ते आपण पाहूया.

1) महागाईचा भुतकाळ तपासा :

 आपण पूर्वीच्या काळात बघितलं असेल, की पूर्वीचे लोकांचे पगार हे शंभर रुपये दोनशे रुपये असायचे पण त्या पैशा नुसारच बाहेरच्या वस्तूंचे देखील दर असायचे. जसजसं पगार वाढत गेले तसतसे वस्तूंचे भावही वाढत गेले.  लोकांच्या हातात पैसे जास्त येत गेले तसे तसे लोकांचे खर्चही वाढत गेले.

आपण जर खाली दिलेल्या  चार्ट मध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपला भारताचा जो महागाईचा दर आहे तो कशा प्रकारे आणि किती पर्सेंट ने वाढला आहे.


2) आपल्या महत्त्वाच्या आणि गरजेच्या वस्तूंचे भाव कसे वाढत गेले :

 जी गोष्ट 15 वर्षांपूर्वी वीस रुपयाला मिळत होती ती आज शंभर रुपये झाली आहे काही गोष्टींची तफावत पाहता सोन्यासारख्या गोष्टींनी उच्चांक गाठला आहे. आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पाहिल्या तरी त्यातला फरक आढळून येईल.

जर का कोणी 15 वर्षापूर्वी शंभर रुपये आपल्या पिगीबँक मध्ये ठेवले असते तर आज त्या शंभर रुपयाची व्हॅल्यू वीस रुपये झाली असेल.


ज्याप्रमाणे आपल्या भारताची इकॉनोमि ग्रोथ होणार त्याच प्रमाणे आपला ठेवीवर मिळणारा जो इंटरेस्ट रेट हा देखील कमी होत जाणार, त्यासाठी आपल्या इन्व्हेस्टमेंट चे आणि सेविंग चे पॅरामिटर ही  चेंज करावे लागणार तरच आपण या महागाईला मॅनेज करू शकू. 

या चार्ट मधले उदाहरण पाहता आपल्या लक्षात येईल की आपली इन्व्हेस्टमेंट ही वाढत्या महागाईच्या दरापेक्षा जास्त रिटर्न देणारी असावी.


आपण पंधरा वर्षांपूर्वीच्या शिक्षणाचे जर  का एज्युकेशन चे रेट पाहिले खर्च पाहिला तर आपल्या असे लक्षात येईल की पंधरा वर्षापूर्वीचा जो आपला शिक्षणाचा खर्च होता आणि पंधरा वर्षानंतर आता जो शिक्षणाचा खर्च आहे त्याच्यामध्ये जवळ-जवळ 10 ते15 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे.

जर का आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या महागाईच्या नुसार इन्व्हेस्टमेंट करणे अत्यंत गरजेचे आहे .आज ज्या  शिक्षणासाठी पंधरा ते वीस लाख खर्च येतोय पंधरा वर्षांनी किती येईल त्याचा अंदाज बांधूनच इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे झालं आहे. 

उ. दा.  आज जर का एखाद्या शिक्षणाची किंमत दहा लाख असेल तरी येत्या पंधरा वर्षात  10% महागाई दर पकडला तर ती रक्कम साधारणता 41,77,200/ हाेते .

आणि यासाठी आपल्याला अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे आहे की महागाईच्या दरापेक्षा आपले रिटन्स हे जास्ती असले पाहिजेत आणि त्यासाठी म्युचल फंड हा अतिशय उत्तम पर्याय आहे इन्व्हेस्टमेंट साठी आपण इथून खूप चांगल्या प्रकारे रिटर्न्स घेऊ शकतो आणि आपल्या ज्या इच्छा आहेत ते इथून पूर्ण करू शकताे.

आपल्या मुलांच्या अगदी लहानपणापासूनच त्यांच्या शिक्षणासाठी ,त्यांच्या लग्नासाठी किंवा आपल्या रिटायरमेंट लाईफ साठी आपण पैशांची तयारी सुरू केली खूप कमी रुपयांमध्ये आपण ही मोठी अमाऊंट जमा करू शकतो, त्यासाठी आपल्यामध्ये सातत्य आणि पेशन्स असणे अत्यंत गरजेचे आहे .पण कोणत्याही इतर कारणांसाठी आपण या फंडातून पैसे काढले नाहीत तरच आपल्याला योग्य त्या गोल साठी इथे मोठी अमाऊंट नक्कीच मिळेल यात शंका नाही. 

अशाप्रकारे आपण योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून इन्फ्लेशन रेटला नक्कीच मात करू शकतो.

अशीच आणखीन उपयुक्त आणि इंटरेस्टिंग  माहिती मी पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊन येणार आहे.

आपल्याला हा Blog आवडला असेल  तर नक्कींच  like, share ,Comment करा. 

अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join  करा. 

हा  BLOG शेवटपर्यंत  वाचल्याबद्दल  धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.

Group join  करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

5 Powerful TipsTO LIVE LIFE KING SIZE

म्युच्युअल फंड आज का गरजेचे आहे?

तुमचं PASSIVE INCOME तयार करा या 5 जबरदस्त टिप्स मधून.