तुमचं PASSIVE INCOME तयार करा या 5 जबरदस्त टिप्स मधून.
तुम्हाला असं वाटतं का ?
की आपल्याला पैशांची कधी चिंता नसावी ......!
आपण काहीही काम नाही केलं तरीही आपले इन्कम मात्र चालू राहावं .....!
पैशांची कधीही गरज भासली तर ती पूर्ण करता यावी....!
मित्रांनो तुम्ही म्हणाल हे काय विचारणं झालं? असं तर प्रत्येकालाच वाटतं ,पण हे होणार कसं.?.....
तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात या गोष्टी अमलात आणायच्या असतील तर काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. आपल्याला निसर्गाचा नियम माहीतच आहे की काहीतरी पेरल्या शिवाय उगवत नाही आणि त्याच्याच नियमानुसार मूठभर पेरलं तरी गाडाभर उगवतं आणि त्यासाठी आपल्याकडे पेशन्स असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आपलं PASSIVE INCOME कसं generate करता येईल याच्याकडे लक्ष दिले पाहिजे.
नमस्कार,
मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि Harshali's wealth creation wisdom या platform ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 17 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची wealth create करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग आपण जाणून घेऊया PASSIVE INCOME म्हणजे नक्की काय.
PASSIVE INCOME :
पण आपण केलेल्या एखाद्या कामाचं त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणुकीचं वारंवार आपल्याला इन्कम मिळणे याला PASSIVE INCOME असे म्हणतात. त्यासाठी तिथं आपल्याला प्रत्यक्ष उपस्थित असण्याची गरज नसते, आपोआप हे इन्कम आपल्याला जनरेट होत असतं.
North America मध्ये एकदा सर्वेक्षण करण्यात आलं की श्रीमंत माणसं असं नक्की काय करतात कि ती अधिक श्रीमंत होत जातात , तेव्हा एक कॉमन उत्तर मिळालं ही माणसं आपले पैसे PASSIVE INCOME जनरेट करण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. नवीन गोष्टी शिकून त्यावर काम करून ठेवतात ,त्याच्यामध्ये निपूणता हासील करतात व त्याचा योग्य ठिकाणी वापर करतात.
कोण कोणत्या मार्गाने आपण PASSIVE INCOME GENERATE करू शकतो ते आपण येथे पाहू.
1) आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की गाण्याच्या माध्यमातून गायकांना रॉयल्टी मिळते.
2) उत्तम ब्लॉगद्वारे ,यूट्यूब चैनल मधून पॉडकास्ट मधून पण PASSIVE INCOME जनरेट करू शकतो. पण त्यासाठी कन्टेन्ट वर काम करणे खूप महत्त्वाचे ठरते. आणि आपला कंन्टेन्ट इतरांना VALUE देणारा असला पाहिजे.
3) E BOOK PUBLISH करून किंवा NET MARKETING करून , तसेच REAL ESTATE मधून देखील आपण Passive income generate नक्कीच करू शकतो.
पण वरील गोष्टीतून पॅसिव इन्कम जनरेट करण्यासाठी त्या गोष्टींमध्ये तुम्हाला पारंगत व्हावं लागतं ,तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकून घ्याव्या लागतात त्या आत्मसात करून त्यावर काम करावं लागतं आणि सातत्यपूर्वक त्यावर काम करून टिकून राहणे गरजेचे ठरते .पण आज मी तुम्हाला सोप्या पद्धती मध्ये कशा प्रकारे आपण आपलं पॅसिव इन्कम जनरेट करू शकतो ते सांगणार आहे .
आपल्याला माहीतच असेल की पैसा पैशाला ओढतो जर का त्याला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केला तर तोच पैसा आपल्याला पैसे कमावून देऊ शकतो.
त्यासाठी सगळ्यात सोपा आणि उत्तम पर्याय जो आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड .....हो ! मित्रांनो म्युचल फंड मधून आपण आपल्या पॅसिव इन्कम खूप चांगल्या प्रकारे तयार करू शकतो.
4) त्यासाठी जेव्हा आपल Active income चालू असतं त्यावेळी एक छोटीशी रक्कम दर महिन्याला बाजूला ठेवून म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट केली तर साधारणता वीस ते पंचवीस वर्ष सातत्याने ही गोष्ट केल्यास एक खूप मोठा कॉर्पस आपण तिथे जमा करू शकतो आणि ह्या कॉर्पस मधून आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम घेऊ शकतो आणि ही रक्कम सुद्धा खूप मोठी असू शकते. अशाप्रकारे जर का आपलं इन्कम जनरेट केलं तर उतारवयात आपल्याला पैशांची कधीच भीती राहणार नाही.
5) त्याचप्रमाणे जर का आपल्याकडे एखादी मोठी रक्कम असेल तर ती रक्कम योग्य म्युच्युअल फंड मध्ये गुंतवून दर महिन्याला तुम्ही त्यातून ठराविक रक्कम (pension ) घेऊ शकता. तसेच तुमच्या मुद्दल रकमेमध्ये सुद्धा वाढ अनुभवू शकता. आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्यातील रक्कम काढू देखील शकता.
म्युचल फंड हे निफ्टी आणि सेन्सेक्स वर आधारित असले तरी long term साठी जर का आपण इथे राहिलो तर Risk ची भीती राहणार नाही .
त्याच बरोबर इतर इन्व्हेस्टमेंट बरोबरच आपला Term Insurance असणे देखील तितकेच गरजेचे आहे. देव न करो पण आपल्या नसण्याच्या परिस्थितीत हाच Term Insurance आपल्या परिवाराला आर्थिक हातभार नक्कीच देईल.
आपलं जीवन हे एका ऑटो मोडवर चालत असत, म्हणून जाणून बुजून आपण आपल्या महत्त्वांच्या ध्येयां वर लक्ष पुरवलं नाही तर आयुष्यातला वेळ असाच फुकट जाईल आणि मग नंतर पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे काही उरणार नाही .त्यासाठी लवकरात लवकर जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे.
अधिक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक खाली देत आहे. 👇
( https://youtu.be/_SCEB73T7Ko )
अशीच आणखीन उपयुक्त आणि इंटरेस्टिंग माहिती मी पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊन येणार आहे.
आपल्याला हा Blog आवडला असेल तर नक्कींच like, share ,Comment करा.
अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा.
हा BLOG शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.
Group join करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .Harshali's Wealth creation wisdom

Great informative
ReplyDeleteखूपच महत्वपूर्ण माहिती 👍
ReplyDeleteThanks dear khup upyukt mahiti ahe
ReplyDeleteAmazing Blog, Very Important Information shared. Got to learn a lot. Thank you 😊
ReplyDeleteKhup chhan mahiti 👌nicely written 👍
ReplyDeleteGood video
खूपच छान लेख झालाय
ReplyDeleteNice Blog 👍🏼
ReplyDeleteVery useful and informative blog...👍
ReplyDeleteVery useful tips, Harshali
ReplyDelete