म्युच्युअल फंड आज का गरजेचे आहे?

तुम्हाला असं वाटतं का की आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावे !

त्याचबरोबर आपल्याला तिथून योग्य असा परतावा मिळावा !

 गरजेच्या वेळी आपल्याला पैशांची सोय व्हावी !

 आपलं भविष्य हे सिक्युअर व्हावं !

तुम्हाला देखील हे प्रश्न पडले असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

आपण नेहमी अशाच ठिकाणी पैसे गुंतवतो ज्या ठिकाणी आपल्याला व आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना माहिती आहे .पण जर का आपल्याला एखाद्या गोष्टींची माहिती नसेल आणि ती गोष्ट खरंच खूप महत्त्वाची असेल तर आपण ती गोष्ट खूप मिस करत आहोत ,आपण आपलं नुकसान करून घेत आहोत . त्यापैकीच एक प्रकार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड.

नमस्कार,

मी हर्षाली एडनकर wealth creation expert.आणि  'Harshali's wealth creation wisdom' या  platform  ची संस्थापिका. Insurance and Investment या क्षेत्रात मी गेली 20 वर्ष कार्यरत असून येत्या तीन वर्षांमध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची  wealth  create  करण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.  

आज म्युचल फंड सारख्या गोष्टींची का गरज आहे!


जर का आपण कमवलेले पैसे हे कपाटात ठेवले तर त्याची व्हॅल्यू भविष्यामध्ये ही कमी होणार आहे,  कारण आपल्या रुपयाची किंमत दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण महागाईचा रेट हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दहा वर्षांपूर्वी आपल्याला लागणाऱ्या रोजच्या वस्तूंचा भाव बघितला तर आज त्यामध्ये भरपूर तफावत आढळते .

म्हणजेच जर का तुम्ही तुमचे पैसे कपाटातच ठेवले तर अशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. बँकेत ठेवले तर महागाईच्या रेट पेक्षा सुद्धा तिथे आपल्याला कमी रेट मिळत आहे. म्हणूनच आता त्याला तोड देण्यासाठी महागाईला बीट करेल अशा ठिकाणी आपण आपले पैसे गुंतवणे खूप गरजेचे आहे.

आणि यासाठीच आपण म्युचल फंड बद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत यामुळे तुमच्या मनातली भीती देखील जाईल व तुम्ही देखील म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या पैशाचा परतावा घेऊ शकाल.

बरेच जण म्युच्युअल फंड व शेअर मार्केट या दोघांना एकाच पारड्यात तोलत असतात दोन्ही ठिकाणी पैसे हे स्टॉक मध्येच इन्वेस्ट होतात पण दोन्ही ठिकाणाची रिस्क मॅनेजमेंट ही खूप वेगळ्या प्रकारची असते. 

चला तर मग बघूया म्युच्युअल फंड मध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो.

 1)  म्युच्युअल फंड साठी कोणत्याही इतर अकाउंट ची गरज नसते :

म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट ची गरज नसते .आपण आपल्या नेहमीच्या सेविंग अकाउंट मधून दर महिन्याला एक छोटीशी रक्कम सुद्धा बाजूला ठेवून म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणे कोणालाही शक्य आहे.

आणि मार्केटच्या चढउतारामुळे आपण कंपाऊंड इफेक्ट प्रमाणे आपल्या फंड मध्ये लॉंग टर्म साठी एक ऍव्हरेज मोठा प्रॉफिट मिळवु शकतो.

आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला स्वतः तिथे बघण्याची गरज नसते , फंड मॅनेजर या सर्व गोष्टी मॅनेज करत असतो.

2)  शेअर मार्केटची भीती:



 म्युचल फंड मध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे जर का आपल्याला मार्केटची भीती वाटत असेल, आपले पैसे डुबले तर.... याची सतत काळजी वाटत असेल, तर अशा लोकांसाठी कमी रिस्क असलेले फंड देखील तिथे Available  असतात आणि त्याच प्रमाणे तिथे परतावा देखील मिळत असतो .पण तरीदेखील बँकेमध्ये असलेल्या एफडी पेक्षा तिथे आपण जास्त परतावा  मिळवू शकतो.

कमी रिस्क असलेले फंड म्हणजे हे बहुतांश गव्हर्मेंट सेक्युरिटी मध्ये असलेले फंड असतात, जे सरकारच्या कामासाठी या फंडचा उपयोग केला जातो . जे आपले गव्हर्मेंट चे प्रकल्प असतात त्या ठिकाणी हा वापरला जातो आणि यातून मिळणारा जो परतावा असतो तो नेहमीच खात्रीलायक असतो .त्यासाठी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केल्यामुळे आपल्या मनातील भीती देखील कमी होते आणि आपल्याला योग्य असा परतावा देखील मिळतो.

3)  लॉंग टर्म बेनिफिट :

म्युचल फंड चा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे यामध्ये जेवढे लॉंग टर्म म्हणजे जास्त कालावधीसाठी आपण इन्व्हेस्ट करू तेवढा त्याचा परतावा खूप जबरदस्त असतो .पण काही कारणास्तव गरजेच्या वेळी तुम्हाला पैसे लागले तरी देखील जेवढे हवे तेवढे पैसे यातून तुम्ही काढू शकता .

आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तेवढे जास्तीत जास्त पैसे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकता.

4) म्युचल फंड चे महत्वाचे प्रकार :



म्युचल फंड मध्ये दोन प्रकार शक्यतो आढळतात ह्याच्यामध्ये एस आय पी म्हणजे Monthly  सेव्हिंग जी ठराविक  तारखेला जी तुम्ही ठरवलेली Amount  असते तेवढीच अमाऊंट दर महिन्याला तुमच्या अकाउंट मधून म्युच्युअल फंड मध्ये  इन्व्हेस्ट होत असते .

आणि जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे lumsum यामध्ये तुम्ही वन टाइम इन्व्हेस्ट करू शकता. तुमच्याकडे एखादी Amount  आली आणि त्यांचा तुम्हाला काही काळासाठी उपयोग नाही आहे तर तुम्ही ती म्युचल फंड मध्ये इन्वेस्ट करू शकता जेवढा जास्त  कालावधी असेल तेवढा त्याचा बेनिफिट मोठ्या प्रमाणात मिळतो .अशा पद्धतीने आपण आपल्या प्रत्येक खर्चाचं नियोजन या म्युचल फंड द्वारे करू शकतो .

उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण ,त्यांची लग्न आपले रिटायरमेंट लाईफ आपलं वर्ल्ड टूर आपली गाडी या सगळ्यासाठी आपण म्युचल फंड चा वापर करू शकतो.

'रिच डॅड पुअर डॅड ' या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट हे नेहमी सांगतात की आपला इन्व्हेस्टमेंट चा रकाना नेहमी सांभाळा, तो मजबूत ठेवा ,जेव्हा त्या रकान्यात पैसे जातील तेव्हा ते बाहेर पडून देऊ नका ,ते त्या रकान्यात गेले म्हणजे तुमचे कर्मचारी झाले असा विचार करा. पैशांबाबत सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ते 24 तास आपल्यासाठी काम करतात ,पिढ्यान पिढ्या ते काम करत असतात ,म्हणूनच दिवसा तुमची नोकरी सुरू ठेवा कष्टाळू कर्मचारीही व्हा, पण मालमत्तेचा रकाना भरण कधीच सोडू नका ,कारण आपलाच पैसा आपल्याला पैसे कमावून देतो आणि एक दिवस असा येईल की हाच पैसा तुमचे सर्व खर्च भागवेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने धनवान व्हाल .

तर मग विचार कसला करताय आजच ठरवा की आपण दर महिन्याला म्युचल फंड मध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायला हवे आहेत .

त्यासाठी नक्कीच मी तुम्हाला मदत करू शकते याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मला 9892420809 या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता, तसेच खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही म्युचल फंड साठी अकाउंट ओपन करून तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता.

https://fundzbazar.com/Link/5pQUVlNsl54

अशाच आणखीन महत्त्वाच्या टिप्स घेऊन मी माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये येत आहे .

हा  BLOG शेवटपर्यंत  वाचल्याबद्दल  धन्यवाद. आपला अमुल्य अभिप्राय नक्की दया.

आपल्याला हा Blog आवडला असेल  तर नक्कींच  like, share ,Comment करा. 

अशाच आणखी उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी ही लिंक click करा. Harshali's Wealth creation wisdom आणि हा group join करा. 

Comments

  1. छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेय हर्षाली. मी करेन call तुला नक्कीच 👍

    ReplyDelete
  2. खूपच अर्थपूर्ण ब्लॉग हर्षाली. उत्तमरीत्या माहिती दिलीस 👍👍

    ReplyDelete
  3. Very Useful & Informative blog. I got lots of valuable knowledge & ideas. Thank You So Much Harshali Tai to share with us your knowledge & experience to make us aware for the need of mutual fund 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

5 Powerful TipsTO LIVE LIFE KING SIZE

तुमचं PASSIVE INCOME तयार करा या 5 जबरदस्त टिप्स मधून.